सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ समर व्हेकेशन मेमरीज… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
☆
उशिरा उठायचं,
आईच्या कामात लुडबुड करायची,
उठल्या उठल्या कॅरम काढायचा,
मित्र मैत्रिणींना बोलावून आणायचं,
सटर फटर काहीतरी खात राहायचं,
कैरीच्या फोडी पळवायच्या,
मधूनच ताट भरून कलिंगडाच्या फोडी यायच्या,
मग कधीतरी जमलं तर अंघोळ,
मग रस काढून उरलेल्या कोयी आणि सालं चोखायची,
पत्त्यांचे डाव, खाऊ, कुल्फीची घंटा,
चार आण्याची की आठ आण्याची कुल्फी आणायची ह्यावर चर्चा,
कॅरम आणि पत्त्याचे उधळलेले डाव,
कुणीतरी लायब्ररीमधून आणून दिलेली एकट्याने बसून वाचलेल्या विक्रम वेताळ, चम्पक, चांदोबा, किशोर पुस्तकं,
एक रुपया तासावर भाड्याने आणलेली सायकल,
भाड्याने आणलेला व्ही. सी. आर. ,
खराबलेल्या कॅसेट्स्,
मग चुलत, आत्ते, मामे, मावसभावा– बहिणींबरोबर एकमेकांकडे राहायला जाण्याचा प्लॅन,
भीत भीत पोहोण्याच्या तलावावर जाऊन कशीबशी संपवलेली ती ४० मिनिटं,
संध्याकाळी बागेत गेल्यावरचा तो भेळेतल्या कांदा कोथिम्बिरीचा आणि पाणी पुरीचा एकत्रित वास,
सगळ्या नातेवाईकांकडे दोन- चार, दोन-४ चार दिवस करून घालवलेली अख्खी सुट्टी,
काहींच्या अगदी बेताच्या परिस्थितीतही केलेले लाड,
कोपरापर्यंत जाणारा आमरसाचा ओघळ,
सगळ्या शर्ट्सना पडलेले रसाचे डाग,
पापड कुरडयाची वाळवणं आणि त्या पळवणं
पहाटे उठून क्रिकेट खेळणे,
एखादा सिनेमा,
ह्या सगळ्यामध्ये ताण म्हणावा म्हणजे अगदी नगण्य असं रिझल्टचं टेन्शन,
तो साधेपणा गेला. आता एवढ्या कुठल्याच साध्या गोष्टीत मन रमत नाही. खूप जास्त काहीतरी entertaining – happening लागतं. छान सुट्टी असायची….. पण संपून गेली……
खरच रम्य ते बालपण….. परत जाता येईल का हो भूतकाळात…?
Missing all..
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : गौरी गाडेकr
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






