गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ आई ही आई असते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆
☆
जराशी गंमत.. अर्थात या सर्व महान माणसांची माफी मागून …
आई ही आई असते…
- आयझॅक न्यूटनची आई : पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का?
- आर्किमिडीजची आई : गाढवा! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?
- एडिसनची आई: अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं!
- जेम्स वॅटची आई : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या! गॅस बंद कर आधी तो!
- ग्रॅहम बेलची आई: ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चा ल णा र नाही!
- मोनालीसाची आई : तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय!
- गॅलेलियोची आई: मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर?
- कोलंबसची आई: कुठे ही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!
- मायकल अँजेलोची आई: इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं!
- बिल गेट्सची आई: दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण ऍडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते!
- फॅरेनहाइटची आई : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?
आणि शेवटी..
- अल्बर्ट आईनस्टाइनची आई: कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!
HAPPY MOTHER’S DAY
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






