श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – सगळं मला कळतं बाबा… – कवयित्री – सुश्री प्रणिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

☆

सगळं मला कळतं बाबा 

खूप खूप दमलास तू 

जिद्द पुरी करता करता 

 प्रमाणाबाहेर थकलास तू. 

☆

‘पेक्षा’जास्त ही अपेक्षा 

नकोच आता काही काळ 

तू मी,… मी तू…

आणि आपली संध्याकाळ !

☆

कातरवेळी सांगीन गोष्ट 

उतरून जाईल सारा शीण 

मांडीवरती डोकं ठेऊन 

विसरुन सारं गाssढ नीज. 

☆

गोष्टी मधल्या सात पर्‍या

आणतील खाऊ तुझ्यासाठी 

तुला जवळ घेऊन होईन 

तुझ्यापेक्षा थोsडी मोठी. 

☆

 टेकीन माझे ओठ अलगद 

तुला झोप लागल्यावर

विश्वामधल्या सर्वात सुंदर 

 सर्वश्रेष्ठ चषकावर !

☆

कवयित्री – सुश्री प्रणिता कुलकर्णी

पुणे

२२/११/२०२३

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted