श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 294  ?

☆ धूळ आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सत्य कायम बोलणारे कूळ आहे

आरशावर का तरीही धूळ आहे

*

मुंगळ्यांना लोभ काही सोडवेना

पाय त्यांचे ओढणारा गूळ आहे

*

ना वयाची बंधने ना शिस्त काही

रीलचे या वाढलेले खूळ आहे

*

टाळता येणार नाही माणसाला

प्राक्तनाने रोवलेला सूळ आहे

*

आगगाडी पाहिली मी कोकणारी

भार येथे सोसणारा रूळ आहे

*

भाग्य माझे तोलणारा फक्त ईश्वर

झाकलेला त्याच हाती तूळ आहे

*

झाड आहे मातीवरती वाढणारे

आणि खाली गाडलेले मूळ आहे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments