श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
कवितेचा उत्सव
☆ बाप… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
☆
बाप होण्यासाठी नुसते पुरुष होऊन चालत नाही.
बाप होण्यासाठी पदवीची अनिवार्यता नाही.
*
बाप होणे म्हणजे नुसते ‘शुक्र‘दान नाही
बाप होणे म्हणजे नुसते ‘पालन‘ करणे नाही.
*
बाप होण्यासाठी लागते सजग मन
असंख्य वादळे झेलणारे खंबीर मन
*
बाप होणे म्हणजे आपल्यातील ‘बालक‘ जिवंत ठेवणे
बालकपण जिवंत ठेवत बाळाला ‘बाप‘ बनविणे
*
बाप असावा बापासारखा तरीही असावे मनी मृदू
निवृत्तींसारखा बाप असावा ज्ञानेश्वरू असावे‘ हृदू
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





