श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # २९८
☆ मोती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
रात सरता सरता
उधळलं हे दवार
कसं मोत्यानं भरलं
सारं माझं हे शिवार
दवाचे हे झाले मोती
दिसे पाना-पानावर
परि वेचता येईना
असा कसा कारभार
अशी मांडली आरास
थोड्या वेळेसाठी सारं
*
काळ्या मातीनं शोषलं
कसं मोती थंडगार
आली किरणं वरती
थोडं भिनलं रं वारं
*
कसं व्हत्याचं नव्हतं
पुन्हा झालं सारं सारं
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




