श्रीशैल चौगुले

? क्षण सृजनाचे ?

☆ पुन्हा एकदा त्याच वळणावर… ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

कवितेतून मनातील भावनांचा विकोपाला गेलेला अहंकार अथवा एकरुपतेच्या मान्यतेत हरवून गेलेल जीवन.

जिथे आत्मघाताने जीवन संपवणारी दोन मने काल्पनिक संवादातून साधू इच्छीतात प्रेमाचा विजय.

खरे तर प्रेम या विषयावर फेलोशिप करणे कठिणच. अगदी शेक्सपिअर व कुसुमाग्रजांसारख्या दिग्गज साहित्यिकांचे चिंतनसुध्दा पूर्णपणे शब्दात अभिव्यक्त झालेले दिसून येत नाही.

अंतरीतील दोन हृदयाची एकत्र येण्याची तगमग म्हणजे प्रेम. प्रेमातील दुरावा यामध्ये समाजातील काही बंधनेही आडवी येतात.त्या प्रेमाच्या मान्यतेत असणा-या विचारधारेला.

विष पिऊन,दरीत उडी टाकून,समूद्रात एकत्रीत बुडून अथवा सर्व प्रेम ऋणानुबध नात्यांना झुगारुन प्रेमी युगलांनी जीवन संपवणे म्हणजे प्रेमातील आतिशोयक्ती म्हणता येईल.

प्रेम केवळ आठवणींवर टिकवता येते.जन्मभर राधा कृष्णासारखे.

भावनिक तृप्ततेच्या जवळ येऊन दुराव्यातील विरहाने जवळ येण्याची आयुष्यभर आठवणींना उराशी कवटाळून एकमेकाविषयी आदर ठेवणे याला प्रेमाची सरळ व्याख्या म्हणता येईल.

प्रत्येक साहित्यिकांना प्रेमावर लिहीणा-या सर्व प्रकारातील कवी,लेखक,कादंबरीकार अथवा प्रत्येक प्रकारातील प्रेमाभिव्याक्ती शब्दात मांडणा-या साहित्यिकांना

त्या त्या विचाराप्रमाणे अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य निश्चीतच आहे.

महाभारतातील सुभद्रा हरण असो अथवा राधेच आठवणीतील प्रेम.प्रेम हे मनातील निर्मळ भावनेच प्रतिक असतं.

माझ्या ‘पुन्हा एकदा त्याच वळणावर’या कवितेसाठी अभिव्यक्त होणे गरजेचे वाटले म्हणून दिली अभिव्यक्ती 🙏

☆ पुन्हा एकदा त्याच वळणावर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

वळणावर त्याच

पुन्हा एकदा येऊन

थांब

मुळीच नकोस मागे जाऊ

जरी पांगल्या सावल्या

लांब.

पहिल्या भेटीचे क्षण

आठव

भिडलेल्या नजरा नयनी

साठव.

जरी दाटून आले ढगही

तिथेच थांब

कारण पावसात भिजताना

दिसतेस छान.

काय म्हणून सांगू,माझ्या

मनाचा हट्ट

सारे जे जे सुंदर ते फक्त

तुझेच रुप.

तुझ्या प्रतिक्षेत अख्ख आयुष्य

निघून गेल

आता अंधार पडतानाही निराशेत

जगून झाल.

मला तुझा होकार कळला नाही

कधीच

म्हणुन तर बदनाम केल तुला मी

आधीच.

असो,हृदय सारख नसत कुणाचं

आणि विचारही

मी एकतर्फी कि तुझ दुनियेला

घाबरण अजाण प्रेम संचारही.

भेटलो असतो,एकांतात कधी

बोललो असतो मनातल

सार राहूनच गेल,नाही का?

पुन्हा एकदा त्याच थांब्यावर

येऊन थांब तशीच

नक्की मी आठवेन तेंव्हा सर्वत्र

काळोखाच साम्राज्य पांघरुन

तुझाही आत्मा हसत असणार

माझ्या आत्म्याशी जन्मात

चुकलेल्या गप्पा रंगताना

चंद्र-चांदण्यात रमलेली

असेल, एक अपूर्ण जीवनाची

प्रेम कहाणी

आत्मलोकाच्या आभाळात.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments