image_print

कविराज विजय यशवंत सातपुते

(आज प्रस्तुत है रक्षा बंधन पर्व पर  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की   विशेष कविता बहिणीची माया. . . . !)

 

☆ बहिणीची माया. . . . ! ☆

 

बहिणीची माया, एक प्रयास

ठरते अगम्य  उत्कट प्रवास.

बहिणीची माया, स्वप्नील वाट

स्वतःच बनते निश्चल पायवाट.

बहिणीची माया,  प्रवाही भाषा.

नाजूक राखीची , साजूक रेषा.

बहिणीची माया, व्याकुळ वेदना

पावसाने जाणलेली धरणीची संवेदना.

बहिणीची माया, बकुळीचे फूल

वास्तवाच्या परिमलात, आठवणींचे मूल.

बहिणीची माया, आवर्त  भोवऱ्यात .

मनातले दुःख,   मनाच्या रानात .

बहिणीची माया, वास्तल्याचे वावर

संकटाच्या पाणवठ्यावर, सुखाची पाभर.

बहिणीची माया,  अवीट हौस

कधी न सरणारा ,  नखरेल पाऊस.

बहिणीची माया, रेशमी कुंपण

अलवार नात्याची,  हळुवार गुंफण.

बहिणीची माया, कधी कथा, कधी कविता

वाचायला जाताच, डोळ्यात सरीता

बहिणीची माया,  एक फुलवात

काळजाच्या दारात उजेडाची वात.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

image_print

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of