(आज प्रस्तुत है रक्षा बंधन पर्व पर कविराज विजय यशवंत सातपुते जी की विशेष कविता बहिणीची माया. . . . !)
☆ बहिणीची माया. . . . ! ☆
बहिणीची माया, एक प्रयास
ठरते अगम्य उत्कट प्रवास.
बहिणीची माया, स्वप्नील वाट
स्वतःच बनते निश्चल पायवाट.
बहिणीची माया, प्रवाही भाषा.
नाजूक राखीची , साजूक रेषा.
बहिणीची माया, व्याकुळ वेदना
पावसाने जाणलेली धरणीची संवेदना.
बहिणीची माया, बकुळीचे फूल
वास्तवाच्या परिमलात, आठवणींचे मूल.
बहिणीची माया, आवर्त भोवऱ्यात .
मनातले दुःख, मनाच्या रानात .
बहिणीची माया, वास्तल्याचे वावर
संकटाच्या पाणवठ्यावर, सुखाची पाभर.
बहिणीची माया, अवीट हौस
कधी न सरणारा , नखरेल पाऊस.
बहिणीची माया, रेशमी कुंपण
अलवार नात्याची, हळुवार गुंफण.
बहिणीची माया, कधी कथा, कधी कविता
वाचायला जाताच, डोळ्यात सरीता
बहिणीची माया, एक फुलवात
काळजाच्या दारात उजेडाची वात.
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.