सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कट्टी-बट्टी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम

कट्टी आणि बट्टी दोन साधे शब्द, पण मानसिक स्वास्थ्याच्या दोन गुरू किल्ल्या!

आपल्या सगळ्यांच्या बालपणात हे दोन शब्द आपल्या आयुष्याचा भाग नक्की असायचे.

 

कट्टी म्हणजे आपला पहिला emotional withdrawal.

 

ना भांडण, ना आरडाओरड, ना मोठं स्पष्टीकरण…

फक्त शांतिपूर्वक घेतलेली तात्पुरती माघार.. …

“मला तुझ्याशी बोलायचे नाही.”

 

त्याचा साधा अर्थ होता,

“मी दुखावलो आहे… पण ते कसं सांगायचं कळत नाही. ”

 

आणि बट्टी?

ती म्हणजे दुरुस्ती.

थोडी awkward असायची..

थोडी न बोलता झाली, तरी पण लगेच व्हायची…

 आपलं मन शांत झाले की लगेच..

 

ना माफीची गरज,

ना कुठले स्पष्टीकरण…

 

एक चॉकलेट शेअर व्हायचे,

एक चोरटे हसू यायचे…

एक “चल ना, जाऊ दे ना”

आणि सगळं पुन्हा मस्त!

 

लहानपणी आपण emotional regulation चांगले करायचो…

फक्त हा शब्द माहीत नव्हता.

पण शरीराने, वयाने मोठे होताना, मनाचा मोठेपणा मात्र लहान होत गेला…

 

आता मोठेपणी कट्टी झाली की,

Emotional distance,

Ghosting,

थंड responses,

लांबलेला आणि अहंकाराच्या खांद्यावर बसलेला अबोला…

न वाचलेले मेसेज,

कधीकधी वरवरची नम्रता,

कोरडे बोलणे…

 

आणि बट्टी?

ती मात्र कठीण होत गेली,

बर्‍याचदा झालीच नाही..

निरागसपणा गेला,

अहंकार आला,

आणि अबोला कायम त्याच्या खांद्यावर घर करून बसला…

 

आपण “तू दुखावलंस मला” न म्हणता, बाहेरून

“ठीक आहे” म्हणायला शिकलो …

आणि आतून मात्र त्याच्यापासून दूर चालायला लागलो…

 

आपण वस्तू Repair करायला जसे विसरलो, तसेच उसवलेल्या फाटलेल्या मनालासुद्धा Repair करायला विसरलो.

 

मनात साठवून ठेवायला लागलो..

भावनांच्या जागी हिशेब आणि गणिते ठेवू लागलो…

आणि डोक्याला त्रास नको म्हणून लांब रहायला लागलो..

 

लहानपणी कट्टी ही तात्पुरती असायची, पण मोठेपणी ती कायमची झाली…

 

आपण विसरलो —

कट्टी म्हणजे शिक्षा नव्हती,

फक्त दुखावलेल्या मनाला थोडी space हवी असायची, म्हणून हक्काने घ्यायचो…

 

आणि बट्टी म्हणजे जिंकणं किंवा हरणं नव्हतं, ते होतं पुन्हा आपल्या मूळ स्वभावात येणं..

आपल्या अमूल्य अशा मैत्रीला जगणं…

 

भक्कम नाती ती नसतात, जिथं भांडणं होत नाहीत.

भक्कम नाती ती असतात, जिथं

“बट्टी” अबोल्याला अहंकाराच्या खांद्यावरून खाली घेते आणि पुन्हा एकदा गप्पिष्ट बनविते…

 

मोठं होणं म्हणजे कट्टीला टाळणं नाही, तर बट्टीला कडेवर घ्यायचा मोठेपणा दाखवणं..

 

हेच खरं ‘कटी-बट्टी’चं सौंदर्य!

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : दीप्ती गौतम

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted