image_print

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है  आपका एक सामयिक एवं विचारोत्तेजक आलेख  “आज प्रेम बदलत चाललयं का…? आणि निखळ प्रेम  कसं असावं…?)

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 35 ☆ 

 ☆ आज प्रेम बदलत चाललयं का…? आणि निखळ प्रेम  कसं असावं…?

आज प्रेम बदलत चाललयं का ? असा विचार करण्या पेक्षा आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम आहे हे समजून घेण्याची आज खरी गरज आहे. आयुष्यातील अनेक वळणावर आपल्याला अनेक व्यक्ती आवडून जातात, मग ते एखाद्या मित्र असेल, मैत्रीण असेल,एखादा सहकारी असेल, शिक्षक असतील, शिक्षिका असतील किंवा आणखी  कुणी असेल, जीवानात येणाऱ्या प्रत्येकाचा वेगळा रंग,वेगळा ढंग,  वेगळी जीवन शैली, वेगवेगळे स्वभाव, गुण आपल्या मनात नकळत घर करून जाते याचा अर्थ माझं समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे असं समजणे आणि त्याला खतपाणी घालणे कितपत बरोबर आहे  आणि असं असेल तर आयुष्यात किती वेळा आणि किती जणांशी आपण प्रेम करणार आहोत परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की कुठेतरी याच आकर्षणाला आज प्रेम समजून त्याला खतपाणी घातलं जातं….! ज्याच्या एखाद्या पैलुवर भाळून आपण प्रेम करायला लागलो त्याचे इतर गुण/  बाबी नाही आवडल्या की ब्रेकअप असा प्रकार सर्रास पाहायला मिळतो परंतु ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला त्याच्या गुणदोषासह स्विकारणं म्हणजे प्रेम असतं हा संस्कारच आज समूळ नष्ट होताना दिसत  आहे. एक प्रियकर किंवा प्रेयसी शंभर टक्के परफेक्ट असणे हे फक्त नाटक /सिनेमातच   शक्य आहे आपल्याला कधी कळणार आहे कोण जाणे …….!

जगात फक्त प्रियकर आणि प्रेयसी, नवरा/ बायको एवढीचं नाती आहेत का…..? विश्व बंधुत्वाची परंपरा जपणाऱ्या देशात निख्खळ मैत्री, मानस भाऊ बहीण, आई वडील,काका मामा, आजी आजोबा ही सगळी लयाला गेली आहेत का…?

थोडंस आपलं लहानपणीचे दिवस आठवा वडिलांचे सगळे मित्र काका त्यांची मुले ताई-दादा, आत्त्याच्या मैत्रीणी आत्त्या आईच्या माहेरी सगळे मावशी मामा आजी आजोबा असायचे. ही सगळी नाती तितक्याच आत्मियतेने सांभाळली जायची यात  जिव्हाळा, प्रेम,आपुलकी, सुरक्षितता ओतप्रोत भरलेली असायची परंतु आजच्या चौकोनी कुटुंबात पाचवा माणूस परका समजला जातो…! हीच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मग ज्याच्या बद्दल आपल्या मनात अशी जिव्हाळ्याची सुरक्षिततेची भावना निर्माण होते तो प्रियकर किंवा प्रेयसी असा अर्थ लावून  मोकळे होतो आणि पुढचे मनोरे बांधायला सुरुवात करतो आणि नकळत ते ढासाळले की ….. ! अनेक विकृतींचा यातूनच जन्म होतो….।

खरी गरज आहे या चौकोनातून बाहेर पडून ताईची मैत्रीणी ताई अन् दादाचा मित्र दादा असू शकतो हे वास्तविक संस्कार  मनावर बिंबवण्याची…अन्यथा कुठलाही कायदा ही परिस्थितीत बदलण्यासाठी असमर्थ ठरतील यात वादच नाही.

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments