सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? संपादकीय १९ जानेवारी २०२२  ?

पत्रकार डॉ. अरुण टीकेकर यांचा जन्म १ फेब्रुवारी ४४ चा. पत्रकार म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाचा १५० वर्षाचा इतिहास लिहिला.  त्या सुमाराला ते टाईम्स ऑफ इंडियाचे उपसंपादकही होते. नंतर लोकसत्ता दैनिकाचे ते संपादक झाले.

अरुण टीकेकरांचे आजोबा केसरीत धांनुर्धारी या टोपणनावाने लिहीत. वडील दूत या नावाने लिहीत, तर काका मुसाफीर या टोपणा नावाने लिहीत. अरुण टीकेकर यांनाही यामुळे टोपणनावात रस वाटला असावा. दस्तुरखुद्द, टिचकी बहाददार अशा अनेक नावाने त्यांनी स्तंभलेखन केले आहे. टीकेकर पुढे ‘सकाळ ग्रुप’ या वृत्तपत्राचे संपादकीय संचालक  झाले. त्यांनी अनेक सदर लेखक घडवले.

टीकेकरांना इंगलीश साहित्याचे अभ्यासक, अध्यापक, १९ व्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणून ते ओळखले  जात होते. ते पीएच डी. होते.

लोकसत्तेसाठी तारतम्य हा स्तंभलेख लिहिल्यामुळे ते तारतम्यकार म्हणूनहा प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे ते ६ वर्षं अध्यक्ष होते. पत्रकारितेबरोबर त्यांनी काही व्यक्तिचित्रेही लिहिली आहेत. मुंबई वुद्यापीठाचा इतिहासही लेखणीबद्ध केलाय.

अरुण टीकेकर यांच्या साहित्यापैकी काही निवडक साहित्य –

१.    अक्षरनिष्ठांची मांदियाळी – ग्रंथशोध आणि वाचन बोध २. इति-आदि ३. ऐसा ज्ञानसागरू – बखर मुंबई विद्यापीठाची ४ ओच्या-वेच्या (प्रवास वर्णन) ५, कालचक्र (सदर लेख संग्रह ) , ६. काल मीमांसा, ७. कालांतर ( लेख संग्रह ) ८.फास्ट फॉरवर्ड ( शरद पवारांच्या मुलाखातींचे आणि भाषणांचे संपादन) ९.रानडे प्रबोधन पुरुष १०. स्थळाकाळ (सदर लेखन)

शरद पवार यांच्या मूळ लेखनाचा अनुवाद आणि संपादन – ‘स्पर्धा काळाशी’ या नावाने      

पुरस्कार – एकमत

अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार

गौरव – जीवन गौरव  पुरस्कार समितीचे अध्यक्ष

दिल्ली येथील लायब्ररी ऑफ कॉंग्रेसमधील माराठी वङ्मय विभागाचे संपादक अरुण टीकेकर यांच्या नावाने ‘मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने’ अरुण टीकेकर प्रगत अभ्यास केंद्र  स्थापन केले आहे. हे केंद्र २०१७ पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक विषयात, संशोधन क्षेत्रात काम करणारे अभ्यासक वा विद्यार्थी यांना दर वर्षी १ फेब्रुवारीला डॉ. टीकेकर अभ्यासवृत्ती दिली जाते. .

☆☆☆☆☆

मा. दा. देवकाते

मारुती  दाजी देवकाते हे मराठी लेखक, पटकथाकार, गीतकार, मराठी चित्रपट सृष्टीतील संवाद लेखक होते. ४० वर्षात सुमारे १५० चित्रपटांच्या कथा, पटकथा त्यांनी लिहिल्या. काही चित्रपटांची गीते लिहीली, तर काही स्वतंत्र गीते लिहिली. त्यांचा जन्म १८जानेवारी १९४१. .

मा. दा. देवकाते यांनी संवाद लिहिलेले काही चित्रपट –

१.डाळिंबी २. थापाड्या ३.पटलं तर व्हाय म्हणा ४. पांडोबा पोरगी फसली  ५. भटकभवानी ६. भन्नाट भानू  ७. भामटा ८. रंगू बाजाराला जाते ९. हळद रुसली कुंकू हसलं. भगवद्गीता आणि महाभारत यांचे त्यांनी अभंगात रूपांतर केले. अभंग गीता  आणि अभंग महाभारत या नावाने त्या रचना प्रकाशित आहेत.

मा. दा. देवकाते यांची पुस्तके –

१.    गीत भीमाचे गाऊ. २. कळप मिळाला मेंढराला, ३. थपाड्या, ४. दामिनी, ५. दुभंग    

६. बळीचा बकरा ७. बुरखा ८ बुमरॅंग, ९. म. ज्योतिबा फुले १०. रॅगिंग, ११. रात्र पेटली अंधाराने .

यांनी रचलेली प्रसिद्ध गीते –

१, आली आली ही गोंधळाला…..आई   २. गणराजाला करू मुजरा ३ .तुझी साथ हवी रे राजा ४ पावना पुण्याचा आलाय गो ५. मला म्हणतात हो पुन्याची मैना ६. सांग माणसा सांग  ७.  सांग सजणा सांग मला ८. हे गणनायक सिद्धी विनायक ९. हे शिवशंकर गिरिजा तनया

इतर – अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे १९७५ पासून ते सक्रीय सदस्य होते.

बारामती येथे भरलेल्या नवोदित मराठी साहित्य संमेलनात वसंत पवार नाट्यगृहाचे,

मा.दा. देवकाते साहित्य नागरी असे रूपांतर केले होते.

 

अरुण टीकेकर आणि मा. दा. देवकाते या दोन्ही प्रतिभावंतांचा आज स्मृतीदिन. त्या निमिताने दोन्ही व्यक्तिमत्वांना विनम्र प्रणाम

 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हा-ड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments