श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ गदिमा यांचे असेही लेखन!!… – लेखक : सुमित्र माडगूळकर ☆ श्री आशिष बिवलकर ☆

गदिमांचे Camlin/Camel ब्रँड साठीचे जाहिरात लेखन!

Camlin/Camel ची शाई अथवा कंपास (कॅमलिन भूमिती बॉक्स) वापरला नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण. कॅमलिन चा पिवळा ऊंट पाहिला की नक्की क्वालिटी प्रॉडक्ट असणार अशी धारणा होती. मराठमोळ्या दांडेकर कुटुंबीयांनी सुरू केलेला हा सुप्रसिद्ध ब्रँड. गदिमांनी चक्क एकदा यांच्या शाईसाठी जाहिरात लिहिली होती. बहुतेक कालनिर्णयचे जयंतराव साळगावकर यांच्या शिफारसीवरून त्यांनी लिहिली असावी असे ऐकल्याचे आठवते. गदिमांच्या जाहिरात लिखाणाचा एक वेगळा पैलू, खास तुमच्यासाठी.

कॅमलिन शाईबद्दल गदिमा लिहितात..

“सरळ सणाणत जातो वेगे 

भात्यामधुनी सुटला बाण 

*

असेच साधे सवेग सुंदर 

कॅमल शाई मधिल लिखाण 

*

मरूभुमिच्या वाटेवरती 

उंटा पाठी मदार आहे 

*

ज्याची त्याची सोय जाणतो 

ऐसा ईश्वर उदार आहे 

*

त्याने निर्मिली कॅमल शाई 

लिहित्या हाता थकणे नाही”

*

गदिमांना सिद्धहस्त लेखक उगीचच म्हणत नसत…

गदिमांनी मिलिटरी मध्ये म्हणतात तसे Fall in म्हंटल्यावर शब्दांनी ‘अण्णा मी कुठल्या जागी जाऊन बसू? ‘ इतकेच विचारणे बाकी होते असे वाटते.

… सुमित्र माडगूळकर

जाहिरात लेखन: ग. दि. माडगूळकर

आठवण सौजन्य:श्री. सुमित्र श्रीधर

प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर 

बदलापूर – मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted