सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री राजकुमार कवठेकर

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ गझलकार श्री राजकुमार कवठेकर यांचा क्लेशवृक्षाच्या छायेतहा दुसरा कवितासंग्रह आज १०मार्च २०२६ रोजी प्रकाशित होत आहे. हा संग्रह कोल्हापूरच्या अक्षरदीप प्रकाशनने प्रकाशित केला आहे.

ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे श्री. कवठेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐

  संपादक मंडळ

 ई अभिव्यक्ती मराठी

आज प्रकाशित होत असलेल्या संग्रहातील एक कविता –

? कवितेचा उत्सव ?

☆ “ढगांनी जसे ग्रासिले” ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

ढगांनी जसे ग्रासिले सुर्यबिंबा

 क्षणार्धात सर्वत्र सांजावले

चकाकून जाती विजांच्या शलाका

 थवे पाखरांचे घरी पातले

 *

धुळीचे कुठे लोळ गेले नभाला

 पुन्हा शांतले वृक्ष.. वेली.. पिले

भुईचे तसे तापलेल्या छतांचे

 उदासीन जे चित्त, आनंदले

 *

उभारून बाहो जणू वृक्ष वेली

 वरूणास व्याकूळ हाकारती

” पुन्हा यौवनाची अम्हा दे उभारी.. “

 तृणांकूर माळासवे प्रार्थती

 *

लडीवाळ बाळापरी पावसाच्या

 नभाच्या कुशीतून आल्या सरी

झळांचा बने थंडसा मंद वारा

 घुमे रानझाडीतुनी बासरी

 *

मघा साठले.. दाटले मोकळे हो

 पुन्हा ऊन हे कोवळे सांडले

तुझ्या आठवांचे ऋतू जीववेडे

 मलाही दिसांनी किती भेटले

© श्री राजकुमार कवठेकर

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments