सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

💐 अ भि नं द न 💐

ललित कला फाऊंडेशन ठाणे. आयोजित साहित्य पुरस्कार सोहळा दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी के. आ. बांठीया विद्यालय सिडको सेक्टर १८ नवीन पनवेल येथे संपन्न झाला. रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी, ज्येष्ठ साहित्यिक माननीय अशोक श्रीपाद भांबुरे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक सेवेच्या सन्मानार्थ, ललित कला साहित्य पुष्प पुरस्कार,  मा. ए. के. शेखमा. तुकाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे श्री अशोक श्रीपाद भांबुरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.! .💐

आज त्यांची कविता “फसली आशा” प्रकाशित करीत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 283 ?

☆ फसली आशा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आज जीवनी उरली नाही कसली आशा

वाट पाहुनी किती उशीरा निजली आशा

*

तिला वाटले उद्या सुखाचा दिसेल तारा

दिव्यत्वाचे स्वप्न पाहुनी चुकली आशा

*

बरेच काही बोलायाचे होते बाकी

कुठे बोलली मुकाट होती बसली आशा

*

बोली होती तिची लागली या बाजारी

अर्ध्या किमती मधेच गेली विकली आशा

*

हिरवी झाली कधीच नाही शेतीवाडी

सुकून गेले स्वप्न बावरे सुकली आशा

*

मृगजळ दिसले धावत गेली त्याच्या मागे

आभासाच्या जलाशयाला फसली आशा

*

तारुण्याचा बहर तसा तर शिल्लक होता

तारुण्यातच अशी कशी ही खचली आशा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments