कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 254 – विजय साहित्य ?

☆ गाथा तुकोबांची…!

गाथा तुकोबांची

अमृताची धारा

प्रबोधन वारा

प्रासादिक..!

*

तुकाराम गाथा

जीवन आरसा

तात्त्विक वारसा

विठू नाम…!

*

दिली अभंगाने

दिशा भक्तीमय

षडरिपू भय

दूर केले…!

*

अभंगांचे शब्द

जणू बोलगाणी

झाली लोकवाणी

गाथेतून…!

*

जीवनाचे सूत्र

महा भाष्य केले

भवपार नेले

अभंगाने…!

*

तुकाराम गाथा

आहे शब्द सेतू

प्रापंचिक हेतू

पांडुरंग…!

*

वाचायला हवी

तुकाराम गाथा

लीन होई माथा

चरणातें…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments