सूचना/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. दीप्ती कुलकर्णी

🪻 अभिनंदन 🪻

नक्षत्रांचं देणं या काव्य मंचाने राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांच्या येता श्रावणया कवितेस प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा !

आज त्यांची कविता “येता श्रावण“,कवितेचा उत्सव‘ या सदरात देत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ? 

☆ येता श्रावण… ☆ सौ. दीप्ती कुलकर्णी

(पुरस्कार प्राप्त कविता)

येता श्रावण, पाउस आला,

थेंबातुनी प्रगटला

रिमझिम सरींना, घेऊनी आला, हर्ष मनी दाटला!

ऊन कोवळे, क्षणात धारा

लपंडाव चालला

पाहता-पाहता, बालचमुही,

मंत्रमुग्ध जाहला!

 

अवनीनेही, हिरवा शालु

अंगभरी ल्यायला

डोंगररानी, तरुवेलींवर, पाचुही प्रगटला!

लोभस, सुंदर, फुले उमलता

तरु साजे खुलला

गंधरुपानै, मोहीत करण्या,

नजराणा उमटला!

 

चातकासही, थेंबा घेऊनी,

जन्म नवा लाभला!

रिमझिम येता, जलधारांचा,

नाद ही झंकारला !

जलाशयाचा, तरुवेलींचा,

जीवनदाता ठरला!

नव अशांचा, नव स्वप्नांचा,

झुला जणु झुलला!

 

इंद्रधनुचा मोहक पट तो,

आकाशी पातला

बालचमुंसह, सर्वांसाठी, आनंददायी ठरला!

सणवारांना घेऊनी आला,

हिरवाई ने सजला

गोफ गुंफण्या, , खेळायाला

महिला वर्गही नटला !!

© सौ. दीप्ती कुलकर्णी

 भ्र. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments