कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७१ – विजय साहित्य ?

☆ एक चंद्र…!

(अष्टाक्षरी)

एक एक पान गेले

मागे डहाळी ठेवून

जीवनाच्या प्रवासात

आहे झाड ते टिकून…!

*

चैत्र पालवीत गेला

कसा सरून वसंत

एकट्याने सांभाळला

जीव अनादी अनंत…!

*

पिढ्या पिढ्या हेच घडे

जाते लेकरू सोडून

आठवांच्या पौर्णिमेला

जाते घरटे देऊन…!

*

किती आले किती गेले

जीवनात हे उन्हाळे

फांदी फांदीने जपले

सुख दुःख पावसाळे…!

*

एक चंद्र ॠतूरंगी

चैतन्याने फुलारतो

कवितेच्या रोमरोमी

अलगद विसावतो…!

*

एक चंद्र शरदाचा

मनी आशा जागवतो

तरू निष्पर्ण होताना

रोमरोमी फुलारतो…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments