श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०५
☆ खोडरबर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
मित्रा
तुझ्या वाढदिवसाला
काय देऊ
असं मित्राला विचारताच
मित्र म्हणाला…
एक पेन्सिल
आणि
एक खोडरबर दे
आयुष्यात
काहीतरी चांगलं
लिहिण्याचा प्रयत्न करीन…
जर कधी काही
चुका झाल्याच
तर त्या खोडायला
तुझा खोडरबर
आणि तुझी आठवण
येवढंच पुरेल मला…
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





