कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७४ – विजय साहित्य ?

☆ मिसळ पाव…!

मोड आलेल्या, मटकी संगे

रस भाजीचा, आस्वाद नवा

मसालेदार, झणझणीत 

पोटभरीचा, पदार्थ हवा.

फरसाणाची, करा पेरणी

कोथींबीरीचा , हात सढळ

रस लिंबाचा, तर्री वरती

कांदा बारीक, मधे चपळ.

 *

मऊ पावाची, घेऊन जोडी

चला मारूया ,‌मजेत ताव

भूक लागता, रस्त्यावरती

चला खाऊया, “मिसळ पाव”.

 *

कोल्हापुरचा, झणका भारी

नाशिकातला, खासच स्वाद

खान्देशातला, खडा मसाला

मिसळींचा या ,चाखा आस्वाद.

 *

पोहे घालून, वाढे लज्जत

नगरी कींवा, असो पुणेरी

पदार्थ न्यारा,भूक वाढवी

कधी कुठेही, लावे हजेरी.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted