कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २८५ – विजय साहित्य
☆ जास्वंद…! ☆
(अक्षरछंद… पंधराक्षरी)
(शीर्षक – औषध खासे.)
☆
ज्या सुमनाचे, चित्र काढता
दिसतो देव
त्या मोरयाची,जास्वंद फुले,
पुजेत ठेव. १
*
पाच पाकळ्या, गर्भ रेशमी,
घेर अनोखा
तुरा शोभतो, फुलातुनी ज्या,
झुलतो झोका. २
*
लाल,भगवा, छटा आगळ्या,
कातर पाने
रंगपंचमी, नाजूक कांती,
रंग दिवाणे.३
*
नको सुईने, हारात गुंफू,
वाहू चरणी
जास्वंदीची, फुले अनोखी,
नाचे धरणी. ४
*
तेल औषधी,त्वचा निरोगी,
किती फायदे
केस त्वचेला, देई तजेला,
गोड वायदे.५
*
अर्क काढूनी, तेल करावे,
औषध भारी
चूर्ण करोनी, चहा करावा,
तो गुणकारी. ६
*
गजाननाच्या,शिरी शोभते,फुल जास्वंदी
निसर्गातले, औषध खासे,
करे आनंदी…७
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




