श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२४ ?

☆ काठी सावर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कसरत करते तारेवरची

खाण्यासाठी भाकर मिरची

*

बाप वाजवी ढोल चामडी

पोरे जमली पारावरची

*

सावकारही आला होता

डोक्यावरती टोपी फरची

*

कुणी न आले वाचवायला

फुले वाळली वेलीवरची

*

मनात आहे काय चालले

रेघ सांगते भाळावरची

*

या कष्टाची भीक तोकडी

कळी खुलेना गालावरची

*

तोल म्हणाला नको घाबरू

काठी सावर हातावरची

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments