सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ. दीप्ती कुलकर्णी
💐 अ भि नं द न 💐
कोकण मराठी साहित्य परिषद,विले पार्ले यांनी प्रकाशित केलेल्या काव्यतरंग या सामुहिक काव्यसंग्रहात , आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका दीप्ती कुलकर्णी यांची ‘शब्दसृष्टी ‘ ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे .एकूण १७५ कवितांपैकी फक्त निवडक ७५ कविता या संग्रहात घेतल्या आहेत.कवितेच्या निवडीबद्दल दीप्ती कुलकर्णी यांचे मन: पूर्वक अभिनंदन
आज ही कविता प्रकाशित करत आहोत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ “शब्दसृष्टी” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
☆
कविता ही माझी |
शब्दांचाच साज ||
प्रतिभेचा बाज |
संगतीला………||१||
*
शब्दांचे ते रुप |
वेधक ही ठरे ||
क्षणातच स्फुरे |
आनंदात……..||२||
*
एकली मी नसे |
सोबतीस येते ||
मनोमनी लेते |
शब्दलेणे ………||३||
*
अक्षरांचा गंध |
घेई वेडे मन ||
फुलतसे तन |
चाहुलीने………||४||
*
माझी ही कविता |
ठाव लेते जनी ||
बोलविता धनी |
निसर्ग तो ………||५||
*
मनाचा गाभारा |
भावनांचा स्नेही ||
प्रतिबिंब पाही |
सुखदु:ख ………..||६||
*
मनी शब्दसृष्टी |
निसर्गाचे रुप ||
वाटते अप्रुप |
दीप्ती म्हणे……..||७||
☆
© सौ. दीप्ती कुलकर्णी
भ्र. ९५५२४४८४६१
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





