सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
राधिका भांडारकर
💐 अ भि नं द न 💐
आश्रय दिवाळी अंक, गोवा, यांनी प्रथमच आयोजित केलेल्या कविता लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. सौ. भांडारकर यांचे आपल्या समुहातर्फे
मन: पूर्वक अभिनंदन. तसेच पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा 💐
पुरस्कार प्राप्त कविता आज प्रकाशित करत आहोत.
💐 हार्दिक अभिनंदन! 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
पुरस्कार प्राप्त काव्य
कवितेचा उत्सव
☆ दोन ध्रुवांवर दोघे आपण… ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
(वृत्त अनलज्वाला)
☆
दोन ध्रुवांवर दोघे आपण धग
विरहाची
कशी जाळते ओढ अंतरी ही
मिलनाची
महालात मी एकटी उभी रजनी
काळी
त्यावेळी तू वनवासाते कर्मा
पाळी
विचार माझा कधीतरी का ये
एकांती?
वाटते कधी, मज स्पर्शाने मिळेल
शांती?
नयनी माझ्या वाहतात या ओल्या
वाटा
वळून मागे पाहिलेस ना जाता
जाता
बोचते मला सुख काटेरी प्रासादी
या
सुखी जानकी रामा संगे वनवासी
त्या
उरी पेटली प्रीती ज्वाला विरून
जाते
केवळ स्वप्नी आता नाथा जपते
नाते
जखम भळभळे उतारा तिला कसा मिळावा?
चौदा वर्षे विरह काळ मी का
सोसावा?
कोमल चरणे तुझी पाहते विद्ध
मनाने
शरयू काठी जळात विरती विरह
तराणे
कधीतरी हे मिटेल अंतर दोन
ध्रुवांचे
मिठीत तेव्हा फिटेल ऋण का
उर्मीलाचे?
☆
© राधिका भांडारकर
वाकड, पुणे
मो.९४२१५२३६६९
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈




