श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – नसे तरी मनी नसो… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
नसे तरी मनी नसो /
परी वाचे तरी वसो //१//
*
देह पडो या चिंतनी /
विठ्ठल नाम संकीर्तनी //२//
*
दंभ स्फोट भलत्या भावे /
मज हरिजन म्हणवावे //३//
*
तुका म्हणे काळातली /
मज सांभाळील हरि //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
मनात जरी नसले तरी नसुदे. पण मुखात तरी देवाचे नाव कायम असुदे. देवाचे नामस्मरण, चिंतन करत असताना मृत्यू आलेला केव्हाही चांगलाच. जगाकडून मला मोठे म्हणवून घेण्यचा बिलकुल सोस नाही. कुणीतरी
मला बडा म्हणावे हा दांभिक पत्ताही मजकडे नाही. लोकानी मला मी फक्त देवाचा म्हणून ओळखावे तेवढीच अभिलाषा आहे. आता काही जरी असले तरी काही काळाने देव माझा प्रतिपाळ करेल याची मला खात्री आहे. मनात देवाचा, परमात्म्याच्या, अध्यात्माचा विचार येणे हे खरेतर अवघडच वाटते. पण आशा वेळी तरी तोंडाने किमान हरिनाम तरी घ्यावे. त्यामुळे तरी थोडे हरिनाम संकीर्तन घडेल. अशा चिंतनात असतानाच मृत्यू आलेला चांगला. भ्रमनिरास करणा-या या लौकिक जगातल्या दांभिक असणा-या मोठेपणाच्या मागे लागू नये. लोकांनी हा देवाचा आहे असे म्हणावे. जगात आपली ओळख अशी असावी. तेवढेच पुरेसे आहे. तुम्ही एकदा देवाचे झालात की देवही तुमचा सांभाळ करण्यास बांधील होऊन जातो.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







