श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – तुटे भवरोग… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
तुटे भवरोग /
संचित क्रियमाणभोग //१//
*
ऐसे विठोबाचे नाम /
उच्चारिता खंडे जनो //२//
*
वसो न सके पाप /
जया त्रिविध तो ताप //३//
*
तुका म्हणे माया /
होय दासी लागे पाया //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
विठोबाचे नाम सर्व गूण संपन्न आहे. त्याच्या स्मरणाने व उच्चाराने संसारातील दुर्धर रोगही तुटून जातात. तसेच प्ररब्धाप्रमाणे साठलेले भोग सुद्धा नाश पावतात. त्याच्या केवळ नामस्मरणाने पुनर्जन्माची भीती रहात नाही. देवाचे सतत नाव घेतल्याने पापाचरण घडत नाही. त्यामुळे नामजप करणाराला जगा कडून कसलाही त्रास होणार नाही. वाईट गोष्टी भोगाव्या लागणार नाहीत. त्या प्रारब्धाप्रमाणे वाट्याला आल्या तरी त्रासदायक वाटणार नाहीत. त्यांच्यावर मोहमाया मोहिनी टाकू शकणार नाही. तर ती त्याच्या पायावर लोळण घेवून त्याची दासी बनेल.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







