श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – पाठी पोटी देव… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
पाठी पोटी देव /
कैसा हरिदासा भेव //१//
*
करा आनंदें कीर्तन /
नका आशंकित मन //२//
*
जिथे कोठे काळ /
करील देवापाशी बळ //३//
*
तुका म्हणे धनी /
सपुरता काय वाणी //४//
– संत तुकाराम.
☆
तुका म्हणे
ज्या भक्ता मागे त्याला सांभाळण्यासाठी देव मागे पुढे उभा आहे त्या हरिच्यादासाला कुणाचे कसले भय असणार आहे. म्हणूनच आनंदाने देवाचे नामस्मरणकरा. कीर्तन करा. मनात कसलाही शंका बाळगू नका. काळ कितीही बलशाली असला तरी तो देवा पेक्षा बलवान नाही. आपला धनी सर्वापेक्षा बलवान असेल तर आपल्या जीवनात सगळीकडे आनंदच आनंद भरून राहील.
ज्याच्या मनात देवाविषयी सात्विक भाव, श्रद्धा, आपुलकी, आणि नितांत आदर असेल तर त्याच्या मनात फक्त देवच कायम वस्तिला असतो. त्याला कशाचीही भीती नसते. आपल्या मनात फक्त देव जपा त्याचे ध्यान करा, कीर्तन करा. मनात कसलीही शंका बाळगू नका. आत्ताचा हा काळ कितीही संकटाचा, अवघड, आणि घातपात करणारा असलातरी देवापुढे त्यांचे काहीच चालणार नाही. ज्याला तुम्ही आपला धनी मानले आहे तो बलशाली परमात्मा तुमचे संरक्षण करील. तुमच्या जीवनात तो आनंदाची सतत बरसातच करत राहील.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







