श्री आशिष  बिवलकर

? क्षण सृजनचा ?

☆– ही जवळची माणसे… – ☆ ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

काही योगायोग असतात… १४ मार्च… कविवर्य सुरेश भट साहेबांचा स्मृतीदिन…

एक महिन्यापूर्वी भट साहेबांची चारोळी वाचायला मिळाली होती – –

रोज छळतात ही

जवळची माणसे

जन्म गिळतात ही

जवळची माणसे

तेव्हा लहान तोंडी मोठा घास म्हणून त्याचा विस्तार म्हणून तीन चार कडवी तेव्हा लिहून झाली पण रचना आज म्हणजे १४ मार्चला पूर्ण झाली…

… रचना पूर्ण झाल्यानंतर लक्षात आले की १४ मार्च हा भटसाहेबांचा स्मृतीदिन!

हीच ती रचना – – (… ळतात हा शब्द एकत्रित आणण्याचा आणि त्यातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न)

☆ ही जवळची माणसे.. ☆

रोज छळतात ही

जवळची माणसे

जन्म गिळतात ही

जवळची माणसे…

*

अडचणीला पळतात ही

जवळची माणसे

आपले परके कळतात ही

जवळची माणसे…

*

सुखामध्ये लोळतात ही

जवळची माणसे

दुःखामध्ये गळतात ही

जवळची माणसे…

*

निकडीला कळतात ही

जवळची माणसे

दुज्यांना फळतात ही

जवळची माणसे…

*

समृद्धीला जळतात ही

जवळची माणसे

कडकीला वळतात ही

जवळची माणसे…

*

नकोशांशी जुळतात ही

जवळची माणसे

कृतघ्नते उसळतात ही

जवळची माणसे…

*

दुराव्यात रूळतात ही

जवळची माणसे

कटाक्षात वळतात ही

जवळची माणसे…

*

भावनांशी खेळतात ही

जवळची माणसे

अंतर्मनात मळतात ही

जवळची माणसे…

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments