सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चित्र एक.. काव्ये दोन – मन देह विठूमय होता.. जगणेच वारी आता !! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

(१)

पाऊस कोसळे येथे

पाऊस कोसळे तेथे

भिजलेल्या पदराखाली

भिजलेले माझे माथे

*

पाऊस असा कोसळतो

थेंबाच्या चिपळ्या होती

पखवाज घुमे देहाचा

जोडून विठूशी नाती

*
पाऊस असा कोसळतो

भिजलेले सारे अंग

ओघळत्या पाण्यामघुनी

ओघवते विठू अभंग

*
मन देह विठूमय होता

नाहीच कशाची चिंता

माऊली जग हे वाटे

जगणेच वारी आता

*
कवयित्री : नीलांबरी शिर्के

(२) 

भाळी अबीर खुलतो

गळा तुळशीची माळ

मुखी विठ्ठल विठ्ठल

हाती लय देती टाळ

*
भेदाभेद अमंगल

हेच वारकरी ब्रिद

माऊली म्हणूनीच

एकमेका घाली साद

*
वारकरी दिंडीमधे

नसतोच दुजाभाव

प्रत्येकाच्या मनामधे

भावभक्तिचेच गाव

*
एकात्मकता दिंडीतली

समाजाची व्हावी निती

सदाचार सदविवेक

व्हावी जगण्याची गती

*
प्रत्येकाच्याच मनात

असो माणूसकी मंत्र

देव मनाच्या देव्हारी

पावित्र्य हे त्याचे वस्त्र

मन पांघरे पावित्र्य

दृष्ट वृत्तीला ना थारा

आपसूक भवताली

शुभ मांगल्याचा फेरा

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments