सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३०२
☆ हे शिव शंकर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
हे शिवशंकर, कर्पूरगौरांगा,
पार्वती पती, माथ्यावर गंगा,
*
महादेव, चंद्रशेखरा, केदारा,
शांभवी प्रिया, हे हरिहरा !
*
करते पूजा शिवरात्रीला
ही सारी तर तुझीच लीला
*
अभिषेक करते, बेल वाहते
व्रत, उपासना, आरती करते
*
शिवशंभो कर रक्षण आता
तूच असशी भाग्य विधाता!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






