सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३०३
☆ रंग… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
आजकाल माझ्याशी बोलतात रंग
आपल्याच मार्गाने चालतात रंग
*
केशरी फुलासाठी शोधते गुलाब
त्याच त्या कहाण्या मग सांगतात रंग
*
मोग-यास माळूनी होता गंधधुंद
एक गोष्ट बेरंगी मांडतात रंग
*
सप्तरंग सृष्टीचे वेढती मलाच
चार बोल बोलूनी रंगतात रंग
*
झाड झाड प्रेमाने साद घालतेच
सावलीत हिर्वाई दावतात रंग
*
भांडतात आकाशी नील शाम श्वेत
वेगळेच आताशा वागतात रंग
*
रंगताच रंगाचा सोहळा नभात
सागरात जोशाने सांडतात रंग
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





