प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३१६
☆ गजल… ☆ प्रभा सोनवणे ☆
☆
सोसला दुष्काळ हा, आता तरी,
पावसाच्या बरसु दे झरझर सरी
*
जातिधर्माचे कशाला दाखले
वाढते आहे विषमतेची दरी
*
तू किती नाकारल्या काळ्या मुली
भांडते रात्रंदिनी गोरी परी
*
कष्ट करणे टाळले वरचेवरी
देत आहे कोण भाजी भाकरी ?
*
ना इथे ना राहते आहे तिथे
भेटला मज विश्वव्यापी तो हरी
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈






