प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२० ?

☆ जीवलगा ☆  प्रभा सोनवणे ☆

रात्र काजळी

भासते आगळी

तू असता जवळी

जीवलगा!

 

पहाट प्राजक्ती

तुझीच आसक्ती

तूच माझी प्रीती

जीवलगा!

 

सकाळ सोनेरी

येता सामोरी

नाव तुझे अधरी

जीवना!

 

येता दुपार

तुझाच विचार

न पडे विसर

जीवलगा!

 

सांज कातर

गेलास तू दूर

मनी हुरहूर

जीवलगा  !

 

पंचप्राण माझे

तुलाच वाहिले

मुक्त मी जाहले

जीवलगा!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted