श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ सुरेख शब्दकळा म्हणजे नेमकी कशी? – कवी : वसंत बापट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
सुरेख शब्दकळा म्हणजे नेमकी कशी?
… याचं एक उत्तम उदाहरण
” बाभुळझाड “
*
अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे
*
देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे बाभुळझाड उभेच आहे
*
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेच आहे
*
जगले आहे, जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे
*
टक… ट्क… टक… ट्क…
चिटर फट्क… चिटर फट्क…
सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलतो आहे, शोषत आहे
*
आठवते ते भलते आहे
उरात माझ्या सलते आहे
आत काही कळते आहे, आत फार जळते आहे
☆
कवी – वसंत बापट
“कविता मना-मनातली”
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





