सुश्री सुनीला वैशंपायन
वाचताना वेचलेले
☆ पावसा पावसा… कवयित्री : सुश्री सुचेता गोखले ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆
☆
पावसा पावसा कुठे आहे तुझे गाव
जाण्याचे म्हणून तू घेतच नाहीस नाव ..
*
ग्रीष्मात तुझे आम्ही केले स्वागत
चिकटूपणा भारी तुला आहे अवगत ..
*
अवनी तहानेने झाली होती व्याकुळ
साद तिची ऐकून, घातलास तू धुमाकुळ ..
*
चिंब ओली धरणी मग कित्ती सुखावली
निसर्गात मग कुंद धुंद हिरवाई पसरली ..
*
बाळराजे अंगणात नाचू लागले थय थय
बळी राजा झाला प्रसन्न,बघून ओले वलय ..
*
हिरवी शाल लेवून, ही अवनी नटली
नव चैतन्याने सृष्टी जणू मोहरली ..
*
विठ्ठलाच्या वारीमध्येसुद्धा तू भेटलास
रेनकोट घालून तू सुद्धा लेझीम खेळलास ..
*
बाप्पा आले घराघरात ,घडला सत्संग
पाऊस गाणी गात भक्तगण झाले दंग ..
*
तुझ्या साक्षीने पार पडले नवदुर्गा पूजन
नवरंगी छत्र्या घेऊन आले रसिक जन ..
*
आली दिवाळी, मनी आले, गेली तुझी स्वारी !
.. .. फराळ,फटाके,अभ्यंग आणि रांगोळ्या,
बासुंदी,करंजी आणि श्रीखंडात चारोळ्या.
सरली की दिवाळी .. . आणि अरेच्चा ..
आला का तू पुन्हा !!!
आता काय ???
.. .. आता पतंग उडवतच जाणार का रे राजसा ….
*
कवयित्री : सुचेता गोखले
संग्रहिका : सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




