श्री अनिल वामोरकर
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ “स्वभावाला औषध असतं” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं.
– स्वभावातला स्व सोडून भाव जपायचा असतो!
– नाराजीतला ना सोडून राजी होऊन हसायचं असतं!
– अधीरातला अ सोडून धीरानं घ्यायचं असतं!
– मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं!
– हरामातला ह सोडून रामासारखं जगायचं असतं!
– संतापातला ताप सोडून संत व्हायचं असतं!
– संवादातला वाद सोडून सुसंवाद साधायचा असतो!
– अहंकारातला अहं सोडून ॐकारात विलीन व्हायचं असतं!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




