शामला पालेकर
वाचताना वेचलेले
☆ “नवदुर्गेची नऊ रूपे..” – कवयित्री : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆
☆ नवरात्र ☆
☆
पहिली माळ वाहते मी, आईच्या नात्याला
तिच्याचमुळे ओळखू शकलो आपण ह्या जगाला.. !
*
दुसरी माळ अर्पण करते एका सहचारिणीला,
आपले सर्वस्व अर्पून ती साथ देते पतीला.. !
*
तिसऱ्या माळेच्या मानकरी आहेत सर्व लेकी,
त्यांच्याचमुळे घर नेहमी बहरलेलं राही.. !
*
चवथी माळ वाहते मी सासूबाईंच्या नात्याला,
त्यांच्या लेकामुळेच तर अर्थ मिळतो जीवनाला.. !
*
पाचव्या माळेचा….हक्क आहे फक्त बहिणीचा,
जिच्या सोबत आठवणी आहेत लहानपणीच्या… !
*
सहावी माळ….. लावली मी भावजयीच्या नावाची,
लक्ष्मीच असते नाही का..ती आपल्या माहेरची.. !
*
सातव्या माळेच्या….. मानकरी आहेत जाऊबाई,
त्यांच्याविना कोणता न सण साजरा होई… !
*
आठवी माळ…. महत्त्वाची, म्हणून मान देते नणंदेला,
वेळ पडल्यास तीच मान देते भावजयीला… !
*
नववी माळ… आहे सुनांच्या नावाची, आईनंतर त्याचं काळजी घेतात लेकाची…!
☆
नवदुर्गेची नऊ रूपे आहेत अति सुंदर,
नमन ह्या रूपांना, ज्यांना स्त्री जगते आयुष्य भर.. !
☆
कवयित्री:अज्ञात
प्रस्तुती : शामला पालेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







