श्री कमलाकर नाईक
वाचताना वेचलेले
☆ “स्टार्टर…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
☆
हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मला सांगा स्टार्टरचा मुख्य जेवणाशी काही संबंध असतो का..?
पण अगदी घरातल्या ‘बायकांसह’ सगळेजण, मिटक्या मारत ते खातात ना…? शिवाय वर रोटी-सब्जीवरसुद्धा ताव मारतात. बरोबर…?
चला हरकत नाही…
पण आता आपल्या घरात जेवायच्या आधी मी सहज चिवड्याच्या डब्याला नुसता हात जरी लावला, तरी जणू प्रलय होतो…!
“आता १० मिनिटात जेवायला वाढतेय ना..?
ही काय डबे शोधायची वेळ आहे…?
पानं घ्या त्यापेक्षा…
ऐन जेवायच्या वेळी पोटात नको ते भरायचं आणि मग जेवणाची बोंब…! ”
आई असो वा बायको,
हा संवाद आजतागायत बदललेला नाही.
अरे व्वा! … म्हणजे बाहेर स्टार्टर्समध्ये ते heavy पनीर कबाब-बिबाब तुम्हाला सहज चालतात हा…
आणि घरात आमच्या हलक्याफुलक्या चिवड्याचे दोन घास तेवढे जड होतात..
खरं सांगतो या दुनियेत न्यायच राहिलेला नाही; हेच खरं…
जाऊ दे…
देव बघतोय वरून…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





