रमा मोडक
वाचताना वेचलेले
☆ ‘हासली दीपावली… – कवयित्री : ऋचा सावरकर ☆ प्रस्तुती : रमा मोडक ☆
☆
थी घालून मांडी
तू रेखिली रंगावली
हासले अंगण ही माझे
हासली दीपावली…
*
भरलेस रंग मनासारखे
शुभ्र रांगोळीत जेव्हा
हसलीस तू मनापासूनी
हासली दीपावली…
*
अंगणी,तुळशीपुढे
रांगेत पणती लाविली
वृंदावनी तुळस हासली अन
हासली दीपावली…
*
लक्ष्मीला पुजताना
मढलीस दागिन्यांनी तू
हासला देव्हाराही तेव्हा
हासली दीपावली…
*
अन्नपूर्णा होऊन तूही
रमलीस सखये माझ्या घरी
घर तृप्तीत नाहले तेव्हा
हासली दीपावली…
*
पाहिले मी तुजकडे
जणू चांदणे ही बरसले
शांती मुखावरी झळकता
हासली दीपावली…
*
लाजुनी बघता माझ्याकडे
खळी गोड ती गालावरी
मुख चंद्रमा उजळला
हासली दीपावली…
☆
कवयित्री :ऋचा सावरकर
प्रस्तुती: रमा मोडक
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






