सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  एक अविस्मरणीय संस्मरण  “समारोप । वास्तव में जीवन के कुछ अविस्मरणीय क्षण होते हैं जिन्हें हम आजीवन विस्मृत नहीं कर सकते । वे क्षण कुछ भी हो सकते हैं  किन्तु,  हाईस्कूल से कॉलेज में पदार्पण के पूर्व हाईस्कूल का फेयरवेल जिसमें लड़कियां साड़ियां और लडके फॉर्मल्स में  सम्मिलित होते हैं, बेहद रोमांचक क्षण होते हैं। उस समय की मित्रता और  भविष्य के स्वप्न संजोते ह्रदय का स्मरण कर या मित्रों में साझा कर एक रोमांच का अनुभव होता है और लगता है  कि  काश वे दिन एक बार पुनः लौट आते जो कि असंभव हैं।  सुश्री प्रभा जी ने उन क्षणों को अपने इस संस्मरण से सजीव कर दिया है। इस भावप्रवण अप्रतिम  सजीव संस्मरण  साझा करने के लिए उनकी लेखनी को सादर नमन ।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 43☆

☆ समारोप ☆ 

आयुष्यात समारोपाचे अनेक प्रसंग आले, लक्षात राहिल असा एकच समारोप, शाळेत असताना मैत्रीणीबरोबर चा अकरावीला घेतलेला शाळेचा समारोप!

मी अकरावीला असताना, शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत शिकत होते, शाळेत भेटली जिवाभावाची मैत्रीण राणी गायकवाड! शाळेच्या send off ला आम्ही साड्या नेसलो होतो,आणि दोघी एकमेकींना खुप छान दिसतेस म्हणत होतो! राणीची मैत्री ही मला आयुष्यात मिळालेली अनमोल देणगी! त्या दिवशी ती माझ्याकडे राहिली होती आणि रात्रभर जागून गप्पा मारल्या होत्या! खरोखर शिरूर मधले दिवस हे मंतरलेलॆ दिवस होते! अकरावी चा अभ्यासही आम्ही एकमेकींच्या घरी रात्री जागून केला, ब-याचदा मी झोपून जायचे आणि ती अभ्यास करत असायची, एकदा रात्री खुप भूक लागली, मी तिच्या घरी गेले होते, तिनं स्वयंपाक घरात पाहिलं फक्त भात शिल्लक होता आणि कांदे, बटाटे, टॉमेटो दिसले आम्ही टॉमेटोची चटनी केली…आयुष्यात ला तो काही पदार्थ बनविण्याचा तो दोघींचाही पहिलाच प्रसंग पण चटणी खुपच टेस्टी झाली होती आम्ही भाताबरोबर खाल्ली!

अकरावीच्या परीक्षेच्या वेळी युनिफॉर्म घालण्याची अट नव्हती पण आम्ही म्हटलं आपण युनिफॉर्मचं घालू कारण नंतर कधीच परत घालता येणार नाही. सगळ्या मैत्रीणी रंगीबेरंगी कपडे घालून यायच्या पण आम्ही आकाशी निळा स्कर्ट आणि पांढरा ब्लाऊज घालून जात होतो! शेवटच्या पेपराच्या दिवशी खुप भरून आलं….कारण तो शाळेच्या समारोपाचा दिवस होता…त्या दिवशी रात्री आम्ही तंबूत माला सिन्हा चा हमसाया सिनेमा पाहिला होता…वो हसीन दर्द दे दो जिसे मै गले लगा लू…..म्हणणारी माला सिन्हा अजूनही आठवते……

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

धन्यवाद हेमंतजी ? सुंदर प्रस्तावना