श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३१ ?

☆ सुखाच्या सरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सुखाच्या सरी झेलता येत होत्या

मला चांदण्या माळता येत होत्या

 *

सुखाशीन माहेर होते तिचेही

घरी सोंगट्या खेळता येत होत्या

 *

झग्यासारखी वेशभूषा फिराया

घरी पैठण्या नेसता येत होत्या

 *

धुरा वाहिलेली गुरूंनींच माझी

कथा त्यामुळे वाचता येत होत्या

 *

सदाचार माझ्या सभोवार कायम

म्हणूनच शिव्या टाळता येत होत्या

 *

नसो ओढ ही शिक्षणाची तरीही

इथे बघ मुली छेटता येत होत्या

 *

घराभोवताली असे फक्त लादी

बिया ना कुठे लावता येत होत्या

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted