श्री जगदीश काबरे
मनमंजुषेतून
☆ “संस्कार म्हणजे…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार.
गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष कमी करायचे.
मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मानव.
… विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते.
… प्रत्येक कार्यच चांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे,
उदाहरणार्थ – –
.. केळी खाऊन आपण साले टाकतो ही कृती आहे.
.. केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रवृती.
.. केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणे ही विकृती.
.. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणे ही संस्कृती.
… म्हणून आपल्या कृत्याची जबाबदारी नशिबावर, ईश्वरावर न ढकलता प्रत्येकाने आपल्या आत डोकावून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून स्वीकारली पाहिजे.
आणि त्यासाठी ईश्वराची नाही तर सदविवेकाची गरज आहे. –
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




