ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ रेणुका माता आरती… ☆ ज्योती कुळकर्णी ☆
(वृत्त: कलापति)
☆
माय रेणुका घरात आज स्थापली
होय ती खरेच आदिमाय वाटली
*
स्वागतास ढोल ताश मीच आणले
टाळ वाद्य वृंद की मृदंग वाजले
आज ती मला सुरेख फार भासली
होय ती खरेच आदिमाय वाटली
*
माय रेणुका घरात आज स्थापली
होय ती खरेच आदिमाय वाटली
**
पारिजात फूल मी तुलाच वाहिले
वाकुनी तुझ्या पुढ्यात भाव अर्पिले
आशिषात हो मला प्रसन्न माउली
होय ती खरेच आदिमाय वाटली
*
माय रेणुका घरात आज स्थापली
होय ती खरेच आदिमाय वाटली
**
पंच आरतीस पाच दीप लावले
पाचशे विडे तुझ्या मुखात ठेवले
वाहिली तुलाच मंत्र पुष्प अंजली
होय ती खरेच आदिमाय वाटली
*
माय रेणुका घरात आज स्थापली
होय ती खरेच आदिमाय वाटली
**
रक्षणास प्रार्थना तुलाच गायली
राक्षसास मारण्यास तूच पावली
सोहळा नऊच रात्र येथ थांबली
होय ती खरेच आदिमाय वाटली
*
माय रेणुका घरात आज स्थापली
होय ती खरेच आदिमाय वाटली
☆
© ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





