वाचताना वेचलेले
☆ वारी… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
◆ कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही,
◆ कोणाला निमंत्रण नाही,
◆ कोणत्याही सोशल मीडियावर जाहिरात नाही,
◆ कुठलीच भंपकबाजी नाही,
◆ कोणालाही कसलंही प्रलोभन नाही,
◆ कोणाचा कोणावर राग रूसवा नाही,
◆ कोण खायला घालेल, की नाहीच , ते पण माहीत नाही, आज मिळालंय, उद्या मिळेल की नाही याची चिंताच नाही,
◆ खिशात एक रूपयाची पण गरज नाही ,
◆ तरीही संबंध कार्यक्रम निर्विघ्न पार पडतो ,
◆ कुठलंही गालबोट लागत नाही ,
◆ इहलोकी यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही,
◆ म्हणून कोठेच गर्वाचा /अहंकाराचा लवलेशही नाही….
◆ दैदिप्यमान, नेत्रदीपक सोहळा,
◆ डोळ्याचं पारणं फेडणारा….
◆ ऊर भरून आणणारा सोहळा,
◆ श्रीमंतच नाही, गर्भश्रीमंत सोहळा…
◆ अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती …
आणि हा सगळा अट्टाहास कशासाठी…
—–तर फक्त…..
मुख दर्शन व्हावे आता…
तु सकळ जनांचा दाता….
घे कुशीत या माऊली…
तुझ्या पायरी ठेवतो माथा …..
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈