सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– सोंगटी…– ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
मीपण माझे मला माहिती
प्यादे मी तर समाजस्थानी
दर्पणात मी प्रतिमा पहाता
वजीर भासतो मीच दर्पणी
☆
आत्मसंमान जपता आपण
आपसूक आत्मविश्वास येतो
खडतर जिवन रस्त्यावरती
ठामपणाने जात राहतो
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈