सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– निरागस शैशव… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
निरागस शैशव
जबाबदारीचे ओझे
खळाळणारे हास्य
कसे मुखी यायचे ! ..
☆
शैशवाचे दारच
बंद तिच्या पाठी
मौनात डोळे
बोले काय बोली !..
☆
अक्वा बिसलरी
काय असत बाई?
माहिती करून
घ्यायचीही नाही ! ..
☆
घरासाठी हवंय
हंडाभर पाणी
सहज मिळेल का ?
सांगता का कोणी ! ..
☆
जगाच्या शाळेत
आम्ही शिकत जातो
आसुसल्या नजरेने
नुसती शाळा पहातो ! ..
☆
पाटी पेन्सिल वही
स्पर्शास्तव हात
आसुसलेले असतात ….
.. आणि तसेच आसुसलेले रहातात ……
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈