महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 151
☆ अभंग – कृपा करी कृष्णा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
कृपा करी कृष्णा, शिणलो भागलो
आणिक थकलो, इहलोकी.!!
☆
सुख प्राप्ती साठी, सदैव झटलो
नाहीच विटलो, अकर्मात.!!
☆
स्वार्थी उपायात, धन्यता मानली
व्यर्थ मी खर्चिली, देह बुद्धी.!!
☆
आता मात्र स्वामी, देई तुझे सुख
दिसावे श्रीमुख, सुमंगल.!!
☆
कवी राज म्हणे, अनंत सुमंत
तूच नितिमंत, महाराजा.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈