श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 179 – जगण्याचे बळ ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
जगण्याचे बळ
माऊलीची माया।
तप्त जीवनात
पिता छत्र छाया।
साजनाची साथ
सहजीवनात।
जगण्याचे बळ
विश्वासाचा हात।
पाडस धरीते
विश्वासाने बोट।
त्याच्या स्वप्नापुढे
सारं जग छोटं।
लाखो संकटांचा
दाटता अंधार।
आशेचा किरण
मनाला आधार।
जीवनी संघर्ष
लागे नित्य झळ।
प्रेम,आशा, स्फूर्ती
जगण्याचे बळ।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈