महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 158
☆ हे शब्द अंतरीचे… हाक तुला अंतरीची…! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/
(अष्टअक्षरी)
☆
हाक तुला अंतरीची
ऐक कृष्णा या दीनाची
नसे तुझ्या-विना कोणी
आस तुझ्या चरणाची…!!
*
दाव तुझे रूप देवा
भावा आहे माझा भोळा
पावा वाजवी कृपाळा
नको अव्हेरू या वेळा…!!
*
दोषी आहे मीच खरा
तुला ओळखलेच नाही
आता करितो विनंती
स्नेह भावे मज पाही…!!
*
राज नम्र शुद्ध भावे
दास म्हणवितो तुझा
प्रेम तुझे अपेक्षित
स्वार्थ पुरवावा माझा…!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈