महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 163
☆ अभंग… दाता कैवल्याचा, मनोहर.!! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/
☆
मानव जीवन, खूप अवघड
साधा परवड, प्रत्येकाने.!!
*
इथे नाही सुख, दुःख ते सदैव
सर्वस्व अभाव, आयुष्यात.!!
*
अशातुनी काढा, अनमोल वेळ
स्मरणात काळ, घालवावा.!!
*
चक्रधारी कृष्ण, त्यास आठवावे
मनी साठवावे, प्रेमादरे.!!
*
कवी राज म्हणे, पुत्र देवकीचा
दाता कैवल्याचा, मनोहर.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈